भविष्य

मानसी इनामदार

समस्या नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल आणि काही ना काही अडचणी येऊन आर्थिक तुटवडा जाणवत असेल तर…

तोडगा – देवघरात पारद शिवलिंगाची स्थापना करावी… आणि दररोज शिवकवच स्तोत्र म्हणावे..

मेष – इच्छापूर्ती होईल

कामाच्या ठिकाणी इच्छा, आकांक्षांना धुमारे फुटतील. मनोरथ पूर्ण होईल. गुंतवणूक करताना सर्व बाजूंनी विचार करा. तुमच्या कामाची विशेष दखल घेतली जाईल. परगावी प्रवास घडेल, पण त्याचा ताण खूप येईल. नवे महत्त्वाचे संबंध प्रस्थापित होतील. अबोली रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः बदामाचा शिरा, दूध.

वृषभ – सुखद धक्का

वातावरणात सकारात्मक बदल घडेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. अनपेक्षित भेटवस्तू मिळेल. त्यामुळे सुखद धक्का बसेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल. चमेलीचा गजरा जवळ बाळगा. देवीची उपासना करा. फिकट जांभळा रंग जवळ ठेवा..शुभ आहार ः पिठले भाकरी.

 

मिथुन – प्रेमाचे रंग

आपल्याला हव्या तशा घटना घडतील. प्रिय व्यक्ती जीवनसाथी म्हणून आयुष्यात प्रवेश करील. त्यामुळे सुखांची बरसात होईल. जीवनाला एक छान ताल लाभेल. संगीत क्षेत्रातील व्यक्तींचा भाग्योदय आहे. प्रेमाचे विविध रंग दिसतील, पण जमिनीवरील पाय सुटू देऊ नका. गुलाबी रंग महत्त्वाचा..शुभ आहार ः हळदीच्या पानातील पातोळे, खोबरे.

कर्क – दूरगामी फायदा

विनाकारण चिडचिड होईल. छोटय़ाशा गोष्टीचा राईचा पर्वत कराल, पण कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने बऱयाच गोष्टी मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी आता करत असलेल्या कामातून भविष्यकालीन फायदा होईल. चमकदार निळा रंग जवळ बाळगा. मारुतीची उपासना बळ देईल..शुभ आहार…पोळी, भाजी.

सिंह – चांगली कृती

कामात अति ताण घेणे टाळा. जोडीदाराशी क्षुल्लक वादविवाद होतील. त्याकडे दुर्लक्ष करा. हातातील पैसे सुरक्षित जागी गुंतवा. कृष्णजन्म आनंदात साजरा कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कृतीमुळे शत्रू मित्र होतील. हिरवा रंग महत्त्वाचा. शुभ आहार… पालेभाजी, ताक.

कन्या – अनपेक्षित धनलाभ

आनंदी रहा, धैर्य बाळगा. प्रतिकूलतेवर मात कराल. आपले मत स्पष्ट मांडा. प्रकृतीस जपा. मुले काळजी घेतील. त्यांना साथ द्या. अनपेक्षित धनलाभ आहे. त्यातून नवी खरेदी कराल. आपल्या मताचे कौतुक होईल. आठवडा चांगला जाईल. पांढरा रंग जवळ बाळगा…शुभ आहार…नारळ, तांदूळ.

तूळ – स्वतःसाठी वेळ

बऱयाच कालावधीनंतर तुम्हाला बराच मोकळा वेळ मिळेल. तो खासकरून स्वतःसाठी द्या, पण खर्च आवाक्याबाहेर होईल. घरगुती खर्चात काटकसर करा. ती जबाबदारी गृहिणींवर पडेल. कौतुक होईल. कामात यश मिळेल. संपूर्ण कुटुंब एकत्र येईल. आकाशी रंग जवळ बाळगा…शुभ आहार…तूप, लोणी.

वृश्चिक – फॅशनेबल व्हाल

आवडीचे छंद जोपासा. आवडत्या गोष्टी करा. पावसात भिजू नका. मनाप्रमाणे जगाल. एखादी छान कलाकृती पाहण्यात येईल. त्यात मन रमेल. नवी फॅशन आजमावाल. केलेल्या कामाप्रती सतर्क रहा. श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागेल. मातीचा रंग जवळ बाळगा….शुभ आहार…रताळी, बटाटे.

धनू – परीक्षेत यश

इतरांचे मन जिंकून घ्याल. मदतीचा हात सढळ राहील. मदत करायचीच असेल तर सत्पात्री मदत अवश्य करा. पैसे बरेच खर्च होतील, पण त्याचे दुःख वाटणार नाही. विद्यार्थ्याना परीक्षेत यश मिळेल. हसतमुख रहा. काळा रंग जवळ बाळगा. तीर्थयात्रा घडेल. कुलदेवीची उपासना करा…शुभ आहार…मत्स्याहार.

मकर – जीवनाचा सोहळा

आयुष्य म्हणजे धमाल, आनंद. हा आठवडा अगदी तसाच आहे. जीवनाचा पूर्ण उपभोग घ्याल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. एखादा सोहळा साजरा कराल. निमित्त धार्मिक असेल. तुमचे ज्ञान आणि अनुभव कारणी लागतील. त्यातून पुष्कळ फायदा होईल. प्रसन्न रंग जवळ बाळगा…शुभ आहार…चण्याची डाळ, गूळ.

कुंभ – मनोमन खूश राहाल

चैतन्याने सळसळता आठवडा. अनपेक्षित लाभ दृष्टिपथात असतील. त्यामुळे खूप आनंदी राहाल. त्याला बरीच कारणे असतील, जी तुम्ही इतरांना सांगू शकणार नाही, पण मनोमन खुश राहाल. कुटुंबात तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. सुदैवी आठवडा. लाल रंग जवळ बाळगा…शुभ आहार…आवडीचे झणझणीत पदार्थ.

मीन – कामे पूर्ण होतील

उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा. जुन्या मैत्रिणी भेटतील. गोपालकाल्यात मोठय़ा उत्साहाने सहभागी व्हाल. घरी कृष्णजन्म साजरा कराल. लहानांची काळजी घ्या. निळा रंग जवळ बाळगा. प्रलंबित कामे पूर्ण होतील. निष्काळजी राहू नका….शुभ आहार…दहीकाला.