एकाच वेळी केली हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, 24 वर्षीय तरुणीला जीवनदान

1266

पनवेलमध्ये राहणार्‍या अक्षरा (बदललेले नाव) या 24 वर्षीय तरुणीला जीवनदान मिळाले आहे. अक्षरा हिला जन्मतःच एक गुंतागुंतीचा हृदयदोष होता. तिच्यावर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे संयुक्त हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली असून तिच्या प्रकृतीत आता झपाट्यने सुधारणा होत आहे.

अक्षरा हिला लहानपणापासून व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट हा आजार होता आणि या गंभीर आजाराचे रूपांतर पुढे आयसनमंजर सिण्ड्रोममध्ये झाले. गेल्या काही दिवसांत तिची प्रकृती खूपच ढासळली. त्यामुळे तिला घरीच ऑक्सिजन थेरपी दिली. जूनमध्ये अक्षरावर संयुक्त हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्र्ाक्रिया केली असून आता तिची प्रकृती झपाटय़ाने सुधारत आहे.

हृदय आणि दोन्ही फुप्फुसांचे प्रत्यारोपण हाच आयसनमंजर सिण्ड्रोमवरील अखेरचा उपाय आहे. अक्षराला असलेल्या व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्टवर लहानपणी शस्त्र्ाक्रिया झाली नाही. शेवटच्या टप्प्यातील हृदय आणि फुप्फुसांचा आजार असलेल्या रुग्णांवर हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यावर हा एकच उपचाराचा पर्याय आहे असे ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप अट्टावार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या