अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर, उपचारांना प्रतिसाद!

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आहे. वाजपेयी हे उपचारांना प्रतिसाद देत असून आणखी दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येईल असे ‘एम्स’च्या मेडिकल बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

aiims-medical-press-release

मूत्रसंसर्गामुळे वाजपेयी यांच्यावर डायलिसिस करण्यात आले असून त्यांना ‘आयसीयू’मध्ये ठेवण्यात आल्याचे सोमवारी रात्री सांगण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, भाजप अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन आदी नेत्यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आपली प्रतिक्रिया द्या