क्रिकेटमध्येही राखीव जागा हव्यात!

सामना प्रतिनिधी । नागपूर

क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीच्या खेळाडूंना 25 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज खळबळ उडवून दिली.

दलित-आदिवासी खेळाडूंची क्रीडा क्षेत्रात आजवर कधीही कदर करण्यात आलेली नाही. त्यांची उपेक्षाच झाली आहे, असे आठवले यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

सामन्यात जे खेळाडू उत्तम कामगिरी करत नाहीत त्यांना विश्रांती द्यावी. त्यांच्या जागी दलित-आदिवासींमधील गुणी खेळाडूंना संधी देण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी केला.

चॅम्पियन्सची चौकशी करा!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम क्रिकेट सामन्यात पाकिस्तानकडून हिंदुस्थानच्या झालेल्या पराभवाची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये उत्तमरीत्या खेळलेले हिंदुस्थानचे क्रिकेटपटू 18 जूनच्या पाकिस्तानविरोधातील अंतिम सामन्यातच कसे गळपटले, असा सवालही त्यांनी केला. त्या सामन्यात फिक्सिंग झाल्याचा दाट संशय आहे असे सांगतानाच आठवले यांनी हिंदुस्थानी टीमच्या नामुष्कीकारक पराभवाची चौकशी करण्याची मागणी केली.

एक प्रतिक्रिया