ढगळ चड्डी घातल्याने धावपटू महत्वाची स्पर्धा हरला

कोलंबियातील काली इथे 20 वर्षाखालील धावपटूंसाठी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या इटलीच्या अल्बर्टो नोनिनो याच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला. या महत्वाच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या अल्बर्टोला ढगळ पँट घालण्याचा फटका बसला. ढगळ पँट घातल्याने त्याचा या स्पर्धेत पराभव झाला.

स्पर्धा सुरु झाल्यानंतर अल्बर्टो वेगात धावत होता. त्याने त्याच्या दोन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत त्याच्या पुढे असलेल्या पहिल्या क्रमांकावरील स्पर्धकालाही मागे टाकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात घोळ झाला आणि अल्बर्टो दोन नंबरवरून मागे फेकला गेला. त्याचा वेग कमी झाल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. अल्बर्टोचा वेग कमी का झाला हे स्पर्धेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट झालं.

अल्बर्टो हा मांडीच्या इथे सतत हात लावत होता. स्पर्धेनंतर त्याच्या या वागण्याचा उलगडा झाला. अल्बर्टोने ढगळ पँट घातल्याने आणि आत अंतर्वस्त्र न घातल्याने अल्बर्टोचे गुप्तांग पँटमधून बाहेर यायला लागले होते. यामुळे अल्बर्टोने स्वत:ची इभ्रत वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र धावता धावता त्याला हे करणं शक्य होत नव्हतं. स्पेनमधल्या माध्यमांनी अल्बर्टोने अंतर्वस्त्रे न घातल्याने त्याचा वेग कमी झाल्याच्या बातम्या दिल्या आहेत.