
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कात्रज येथील मामासाहेब मोहळ कुस्ती संपुलात नुकतीच महिला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निवड झालेला संघ आग्रा (उत्तर प्रदेश) येथे 30 ते 31 जानेवारीदरम्यान होणाऱया 23व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाइल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. कोल्हापूरची स्वाती शिंदे व नगरची भाग्यश्री फंड या आशियाई पदक विजेत्या मल्लांवर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची मदार असणार आहे.
निवड झालेला महिला संघ
- 50 किलो – स्वाती शिंदे (कोल्हापूर),
- 53 किलो – नंदिनी साळोखे (कोल्हापूर),
- 55 किलो – दिशा कारंडे (कोल्हापूर),
- 57 किलो – विश्रांती पाटील (कोल्हापूर),
- 59 किलो – अंकिता शिंदे (कोल्हापूर),
- 62 किलो – भाग्यश्री फंड (नगर), 65 किलो – श्रुष्टी भोसले (कोल्हापूर),
- 68 किलोः ऋतुजा संकपाळ (कोल्हापूर),
- 72 किलो – प्रतीक्षा बागडी (सांगली),
- 76 किलो – पौर्णिमा सातपुते (कोल्हापूर).
आपली प्रतिक्रिया द्या