शिवसैनिकांनी केली एटीएमची आरती

18

सामना ऑनलाईन । प्रतिनिधी

वर्ध्यात एटीएम आणि बँकांमध्ये पैसे नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहेत. त्याविरोधात वर्धा येथील सेलू येथे शिवसैनिकांनी बंद एटीएमसमोर आरती करून निषेध नोंदवला. एटीएममध्ये लवकरात लवकर पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

वर्धा जिह्यात १७८ एटीएम असून त्यातील ९० पेक्षा जास्त एटीएम बंद आहेत. चालू असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी रांगेत तासभर ताटकळत उभे रहावे लागत आहे. गावातील एटीएम शोधा आणि त्यात पैसे असतील तर रांग लावा असा दिनक्रम सध्या वर्धावासीयांचा बनला आहे. एटीएम शोधण्यासाठी त्यांना गावोगावी फिरावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या