एटीएम सेंटरची होळी पेटली, पैशांसकट मशिन जळून खाक

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्याची राजधानी पणजीमधील एम.जी. रोडवरील धनलक्ष्मी बँकेच्या एटीएम सेंटरला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये पैशांनी भरलेलं एटीएम मशिनही जळालं आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली.
शार्ट सर्किटमुळे एटीएमला आग लागली असावी असा संशय आहे. एटीएमच्या वर एसीचे ४ कॉम्प्रेसर होते ते देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण सेंटर जळालं. अग्निशामक दलाच्या जवानांना ही माहिती मिळताच त्यांनी २ बंबाच्या सहाय्याने आग विझवली.  या एटीम सेंटरच्या वरच्याबाजूला एक मेगास्टोअर आणि काही कार्यालयं आहेत, आगीची झळ त्यांना बसू नये यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. आगीत नेमके किती रुपये जळून खाक झाले हे तपासानंतर स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या