एटीएम मशीनवर दरोड्याचा प्रयत्न; परप्रांतीय टोळीला अटक, पाच गुन्ह्यांची उकल

पुणे शहरातील कोंढवा, हांडेवाडी आणि मोहमंदवाडी परिसरातील एटीएम मशीनवर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय टोळीतील दोघांना कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

रोहित रामखिलावन मिश्रा (वय 24), शिवम ओमकार तिवारी (वय 19 रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याचे साथीदार शिवम सोनी आणि वाल्मिकी शुक्ला फरार झाले आहेत. कोंढवा, हांडेवाडी, मोहम्मदवाडी भागात मध्यरात्री एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणारी टोळी सक्रिय झाली होती.

टोळीने विविध बँकेचे एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पंरतु बॅकेच्या सीसीटिव्ही सर्व्हिलन्स आणि पोलिसांच्या गस्तीमुळे पाच ते सहा चोरीचा प्रयत्न फसले होते. या प्रकरणी तांत्रिक विश्लेषणाद्वारे दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीची माहिती पोलीस अंमलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर, निलेश देसाई यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने गुजरातमधून दोघांना अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, एपीआय अनिल सुरवसे, अमोल हिरवे, गणेश चिंचकर, नीलेश देसाई, रत्नपारखी, रासगे, जडे, राठोड, भोसले, मोरे यांनी केली.

एटीएम मशीनवर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरेलेले ग्रँन्डर, कटावनी, हातोडा, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
– सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे