‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’ खतरनाक; समाज दुभंगेल

11

सामना ऑनलाईन । मथुरा

केंद्र सरकारने दुरुस्ती केलेला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) हा खतरनाक आहे असे सांगतानाच त्याने समाज दुभंगेल, अशी भीती द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केली आहे.

‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’च्या मुद्दय़ावरून शंकराचार्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयींपासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचे नेते आणि भाजप हा ‘हिंदूविरोधी’ आहे, असा स्पष्ट आरोपच केला आहे.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती हे सध्या अटल्ली चुंगी येथील आश्रमात आहेत. ‘ऍट्रॉसिटी ऍक्ट’वर त्यांची भूमिका मांडणारे खास पत्रक द्वारका-शारदापीठाच्या प्रतिनिधी डॉ. दीपिका उपाध्याय यांनी प्रसृत केले आहे.

एखाद्याच्या तक्रारीवरून दुसऱयाला सरळ तुरुंगात डांबणारा अॅट्रॉसिटी अॅक्ट हा चुकीचा आहे असे शंकराचार्यांनी त्या पत्रकात म्हटले आहे. दलितांचे कल्याण झाले पाहिजे. त्यांच्याशी भेदभाव केला जाता कामा नये, पण त्या कायद्याने वर्गभेद वाढून देशाची पीछेहाट होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भलेबुरे लोक तर सर्वच जातींमध्ये असतात, पण अॅट्रॉसिटी अॅक्ट हा खतरनाक हत्यार ठरेल. त्यातून लोकांमध्ये एकमेकांविषयी घृणा वाढेल. – स्वरूपानंद सरस्वती, शंकराचार्य

आपली प्रतिक्रिया द्या