साकळी गावातून एटीएस पथकाने तरूणास उचलले

22

सामना प्रतिनिधी । यावल

यावल तालुक्यातील साकळी या गावी दुचाकीचा गॅरेज असलेला 28 वर्षीय वासुदेव भगवान सुर्यवंशी या तरूणास एटीएसच्या पथकाने अचानक गावात येवून आज गुरूवारी ताब्यात घेतले आहे. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच साकळी येथे अनेक चर्चा व तर्कांना उत आला आहे. ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी काहीएक माहिती देण्यास नकार दिला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की हे मुळ गाव वासुदेव चव्हाण यांचे आहे. मात्र यावल तालुक्यातील साकळी हे त्याच्या मामाचे गाव असुन तेथे त्याचे वास्तव्य आहे. एटीएस पथकाने आज दुपारी साकळी गावात खाजगी वाहनाने येवून वासुदेव सुर्यवंशी यास ताब्यात घेतले. वासुदेवच्या घराची झडती दुपारी 3 ते साडेपाच या वेळेत अधिकाऱ्यांनी केली. या झडतीत काही कागदपत्रे, सीडी त्यांना आढळून आली. हे साहित्य पथकाने ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या