प्रसिद्ध गायिकेवर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर गळ्याला चावला

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भोजपुरी सिनेमाची तरुण गायिका सोनी सिन्हावर मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. गाण्याचे रेकॉर्डिंग करून परतत असलेली सोनी घराजवळ होती त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्याचा चावा घेऊन धारदार शस्त्राने हल्ला केला आणि पळून गेला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सोनी जोरात ओरडू लागली. सोनीचा आवाज ऐकून घरातली मंडळी धावत बाहेर आली. त्यांनी जखमी झालेल्या सोनीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचारानंतर सोनीला वाराणसी येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सध्या सोनीवर वाराणसी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या