कामावर काढल्याच्या संशयावरून वृद्धावर चाकू हल्ला

26

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण बंदर परिसरात रविवारी एका वृद्धावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. रमेश भिकाजी मांजरेकर यांच्या पोटात विश्वास मेस्त यानं चाकुने वार केल्याची घटना रविवारी घडली. जखमी रमेश यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असुन असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ला केल्यानंतर पळून गेलेल्या विश्वास मेस्त याला मालवण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

चार महिन्यांपूर्वीही पर्यटन व्यवसायाच्या वादातुन एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र रविवारी पुन्हा एकदा चाकू हल्ला झाल्यानं मालवण परिसर हादरून गेला आहे. विश्वास मेस्त यांचा मांजरेकरांवर कामावर काढून टाकल्याचा संशय होता. त्या रागातून मेस्त यांनी हा हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या