नीरव मोदीची महागडी घड्याळे, गाड्या, पेंटिंगचा होणार लिलाव

nirav-modi-new

पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 400 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला फायरस्टोन हिरे कंपनीचा मालक नीरव मोदीच्या जप्त करण्यात आलेल्या महागडय़ा कार, लाखो रुपये किमतीची घडय़ाळे आणि अन्य महागडय़ा वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वस्तूंच्या ऑनलाईन लिलावाची जबाबदारी मुंबईतील सैफरन आर्ट्सकडे सोपवली आहे.

हा लिलाव येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर दुसरा लिलाव 3 आणि 4 मार्चला होणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहिल्यांदाच एखाद्या व्यावसायिक लिलाव कंपनीकडे जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या