व्हेंटिलेटरवरील 120 किलो वजनाची महिला कोरोनामुक्त, लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह असतानाही वाचवले प्राण

737

वयोवृद्ध आणि रक्तदाब, मधुमेहासारख्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या कोरोनाबधितांच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत जगभरातील संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा आणि प्रशासन चिंतित असताना एमजीएमच्या डॉक्टरांनी मात्र यावर मात केली आहे. रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या आणि तब्बल दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या 60 वर्षीय वृद्धेला डॉक्टरांनी कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे. गुरुवारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित वृद्धेला डिस्चार्ज दिला. अक्षरशः मृत्यच्या दाढेतून प्राण वाचवल्याबद्दल संबंधित वृद्धा आणि त्यांच्या नातेवाईकांनी एमजीएमच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

बेगमपुरा भागातील रहिवाशी असलेल्या या वृद्ध महिलेला सुरुवातीला ताप, सर्दी, खोकलासोबतच श्वसनाचा त्रास होत होता. या वृद्धेचा मुलगा डॉक्टर असल्याने ही लक्षणे त्याने ओळखली. आधीच उच्च रक्तदाब, तब्बल 120 किलो वजन आणि मधुमेह या व्याधींनी ग्रस्त असल्याने त्यांच्यावर त्वरित उपचार होणे गरजेचे होते. मात्र, शहरात विविध रुग्णालयामध्ये वृद्धेसाठी आयसीयूचे बेडच मिळत नव्हते. अखेरीस तिच्या डॉक्टर मुलाने एमजीएम रुग्णालयाशी संपर्क केला. एमजीएमने त्यांची कोविडची चाचणी केली आणि त्यात त्या पॉझिटिव्ह आढळल्या. त्यामुळे त्यांना तत्काळ कोविडवरील उपचारासाठी बनवलेल्या खास अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले.

पाश्चिमात्य देशांची नक्कल केल्याने ‘कोरोना’ ऐवजी अर्थव्यवस्थाच नष्ट झाली; उद्योगपती राजीव बजाज यांची टीका

दरम्यान, वृद्धेला श्वास घेण्यास त्रास होत होता, रक्तातील शुगरचे प्रमाणही वाढले होते तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही प्रचंड कमी झालेले होते. वय, व्याधी आणि अन्य कारणांमुळे ही वृद्धा जोखमीच्या बाबतीत हायरिस्क झोनमध्ये होती. त्यामुळे एमजीएमच्या चमूने लागलीच आयसीयूत घेत नव्हते. चमूने लागलीच आयसीयूत घेत व्हेंटिलेटर लावून त्यांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले. विविध व्याधींनी ग्रस्त असल्याने त्यावरही उपचार सुरू केले. शिवाय, मानसिक समुपदेशन, फिजिओथेरपीही सुरू करत वृद्धेला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालले होते. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच वृद्धेने उपचाराला साथ द्यायला सुरुवात केली आणि तब्बल 11 दिवस व्हेंटिलेटरवर राहून कोरोनामुक्त झाली.

‘मिशन बिगिन अगेन’बाबत जारी केलेल्या नियमात बदल, ‘या’ गोष्टी होणार सुरू, ‘या’ वर बंदी कायम

एमजीएमने कोविडग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र टास्क फोर्स तयार केलेला आहे. या वृद्धेचा उपचारासाठी एमजीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेश बोहरा, उपअधिष्ठाता डॉ.प्रवीण सूर्यवंशी, अधीक्षक डॉ.राघवन यांच्या मार्गदर्शनाखाली कोविडसंदर्भातील मुख्य समन्वयक डॉ.आनंद निकाळजे, डॉ. रोहन गुंड्रे, डॉ.प्रशांत अक्कूलवर, डॉ.प्रदीप तौर, डॉ.योगेश अडकीने तज्ञ डॉक्टरांसोबत विविध विभागाचे प्रमुख, निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. एमजीएममध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या 125 कोरोनाग्रस्त रुग्णापैकी 60 कोरोनामुक्त, अन्यही बरे होण्याच्या वाटेवर आहेत.

गंभीर आणि वयोवृद्धांनाही वाचवणे शक्य
ज्येष्ठ नागरिक, विविध व्याधींनी ग्रस्त किंवा गंभीर रुग्णांना वाचवणे अशक्य असल्याचा संभ्रम या वृद्धेवरील उपचाराने दूर केला आहे. आयसीयूतील दर्जेदार उपचार आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने अशा रुग्णांनाही कोरोनामुक्त करता येऊ शकते, हे आम्ही सिद्ध करून दाखवल्याचा आनंद आणि समाधान आहे. एमजीएममध्ये अद्यापही सुमारे 25 वयोवृद्ध रुग्ण दाखल असून त्यांनाही आम्ही नक्की कोरोनामुक्त करू, असा आम्हाला विश्वास आहे.
– डॉ.आनंद निकाळजे, मुख्य समन्वयक (कोविड), एमजीएम रुग्णालय.

लोकांमधील गैरसमज आणि भीती दूर करणारे यश
रुग्ण एकदा व्हेंटिलेटरवर गेला की वाचणे अशक्य असते, अस गैरसमज आणि भीती लोकांमध्ये सध्या आहे. एमजीएमच्या डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर 2 आठवडे ठेवूनही या वृद्धेला वाचवत लोकांची ही भीती आणि गैरसमज दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या रुग्णासाठी आम्ही आयसीयूतच डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. कोविडच्या प्रतिकारासाठी एमजीएमने तयार करून दिली होती. कोविडच्या प्रतिकारासाठी एमजीएमने तयार केलेल्या सर्व पायाभूत सुविधा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने हे सर्व शक्य होत आहे.
-डॉ.प्रवीण सूर्यवंशी, उपअधिष्ठाता, एमजीएम रुग्णालय.

एमजीएमच्या डॉक्टरांमुळे आईचा पुनर्जन्म
आईची तब्येत खूप गंभीर होती. त्यातच त्यांच्यावर आधीच 4 विविध शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. मी स्वतः डॉक्टर असूनही मला कोविड उपचाराच्या रुग्णालयाविषयी माहिती नव्हती. सुदैवाने एमजीएममध्ये उपचार मिळाले. इतक्या सर्व व्याधी आणि गंभीर परिस्थितीतही एमजीएमच्या डॉक्टरांनी अत्यंत योग्य उपचार करत माझ्या आईचे प्राण वाचवले. हा तिचा पुनर्जन्म झाल्याची माझी भावना आहे.
– कोरोनामुक्त वृद्धेचा मुलगा

आपली प्रतिक्रिया द्या