संभाजीनगरात 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण, बाधितांची संख्या 239 वर

982

संभाजीनगर शहरात आणखी नवे 23 कोरोनाबधित आढळल्याने संभाजीनगरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 216 अधिक 23 अशी एकूण 239 झाल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

शनिवारी सकाळी संभाजीनगरात नवे 23 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शहराला कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे सिद्ध होत आहे. आज सकाळी नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नूर कॉलनीतील 5, बायजीपुरा येथील 11, कैलास नगरमधील 3, समतानगर भागातील 2 आणि जयभीमनगरमधील 2 जणांचा समावेश आहे.

शहरातील बाधितांच्या झपाट्याने वाढलेल्या संख्येच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र नगण्य आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरातील जिल्हा रुग्णालयाची टीम महाराष्ट्रात आघाडीवर होती. येथील कोरोना मुक्त होणाऱ्या रूग्णांची टक्केवारी 43.19 पर्यंत पोहोचली होती. मात्र आज ती टक्केवारी 9.64 पर्यंत खाली आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या