मराठवाड्यातील तळीरामांची दारुसाठी विदर्भात घुसखोरी

1405

राज्य शासनाने 3 मे नंतर काही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहुन ऑरेंज झोन मधील समावेश असलेल्या जिल्ह्यातील दारुची दुकाने सुरू करण्याची मुबा दिली आहे. मात्र यात जालना व संभाजीनगार येथील दारुची दुकाने अपवाद ठरली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील दारुची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्याने घेतला असल्यामुळे येथील दुकाने आता सुरू आहे.

आपली हौस पुरी करण्यासाठी जालना व संभाजीनगर जिल्ह्यातील तळीराम विदर्भात जाऊन जिल्हाबंदीचे आदेश झुगारून दारू आणण्यासाठी जात आहे. शनिवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथून काही जण देशी दारू अवैधरित्या चोरटी वाहतुक करीत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून यातील एकाला अटक केली. तर एकाने पोलिसांना पाहताच पाल काढला. पोलीसाच्या तावडीत सापडलेला विकी नाना काकफळे वालसावगीचा असून फरार आरोपी कृष्णा अशोक खरात असल्याचे विकीने पोलीसाना सांगितले. त्याच्या ताब्यातून 8 हजार 100 रूपयांच्या 90 बाटल्या जप्त केला आहे. पारध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मागील आठ दिवसात भोकरदन व पारध पोलीसात आतापर्यंत पन्नासच्या वर गुन्हे दाखल झाली असल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या