कारच्या धडकेत दोन महिला ठार

878

संभाजीनगर महामार्गवर नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यानजीक रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील लग्नाचे वऱ्हाड संभाजीनगर जिल्यातील लासूर जवळील भानवाडी येथे चालले होते. वऱ्हाडातील एक टेंपो देवगड फाटा पासून एक किलोमीटर अंतरावर थाबला. या मधील काही महिला लघुशंकेसाठी रस्ता ओलांडत असताना एका कारने जोराची धडक दिल्याने ताराबाई संतोष वणवे (53) आणि मंगल सुनिल काळे (45) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस फरार कार चालकाचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या