संभाजीनगरात बाधितांची संख्या घटली! जिल्ह्यात 1241 कोरोनाबाधित, आज 23 रुग्णांची नोंद

corona-virus-new-lates

संभाजीनगर शहरात कोरोनाची साखळी तुटत चालल्यामुळे बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शुक़वारी बाधितांची संख्या 32 होती, ती शनिवारी 23 वर आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या कमी होत असल्याने संभाजीनगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शनिवारी 23 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1241 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सादाफ नगर(1), रेहमानिया कॉलनी (1), महेमूदपुरा(1), औरंगपुरा (1), एन-8 (1), एन-4, गणेश नगर (1), ठाकरे नगर, एन-2 (2), न्याय नगर (3), बायजीपुरा (1), पुंडलिक नगर (2), बजरंग चौक, एन-7 (3), एमजीएम परिसर (1), एन-5 सिडको (1), एन 12, हडको (1) पहाडसिंगपुरा (1), भवानी नगर (1) आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये सहा महिला आणि 17 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या