संभाजीनगर जिल्ह्यात 3162 रुग्णांवर उपचार सुरू, 113 रुग्णांची वाढ

572

संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी 113 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्याबरोबर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 8577 वर पोहोचली आहे. त्यापैकी 5061 रुग्ण बरे झाले, 354 जणांचा मृत्यू झाला. तर 3162 जणांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णांमध्ये 9 रुग्णांची सिटी एंट्री पॉइंट येथे अँटीजन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मनपा हद्दीत 102 रुग्ण
आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीत 102 नवीन बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये रमानगर (1), सादातनगर, रेल्वे स्टेशन परिसर (2),भावसिंगपुरा (1), मयूर पार्क (5), कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी (1), पद्मपुरा (3), एकनाथनगर (3), शिवशंकर कॉलनी (8), ज्ञानेश्वर कॉलनी (1), भानुदासनगर, आकाशवाणी परिसर (1), मित्रनगर (4), उत्तरानगरी, धूत हॉस्पीटलमागे (1), अंगुरीबाग (1), अरिहंतनगर (1), एन-6 सिडको (4), एन-4 सिडको (1), सेव्हन हिल (2), गजानन कॉलनी (1), जाधववाडी (1), तिरूपती कॉलनी (1), विष्णूनगर (4), आयोध्यानगरी (2), कांचनवाडी (1), चिकलठाणा (3), विवेकानंदनगर, एन-12 हडको (1), कोहिनूर गल्ली रोड (1), एन-9 पवननगर (1), एन-7, सिडको (1), जयभवानीनगर (1), देवळाई चौक, बीड बायपास (1), रेणुकानगर, शिवाजीनगर (10), गुरूप्रसादनगर, बीड बायपास (1), जालाननगर (1), एसआरपीएफ कॅम्प, सातारा (1), जयनगरी, बीड बायपास (3), आयोध्यानगर (13), श्रीकृष्णनगर (2), रायगडनगर (1), नारेगाव (1), नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी (2), गुरुगोविंदसिंगपुरा (1), बजाजनगर (3), अमेरनगर, बीड बायपास (1), सातारा परिसर (1), गारखेडा (1)

ग्रामीण भागात 11 रुग्ण
ग्रामीण भागात आज सकाळी 11 नवीन बाधित आढळून आले. यामध्ये लोनवाडी, सिल्लोड (1), दहेगाव, वैजापूर (1), वडगाव कोल्हाटी (1), गांधीनगर, रांजणगाव (1), पांडुरंग सो., बजाजनगर (1), अरब मोहल्ला, अजिंठा (1), हनुमाननगर, अजिंठा (1), रेणुकानगर, अजिंठा (2), तेलीपुरा गल्ली (1), मातोश्रीनगर, रांजणगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या