संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी माजी आमदार नितीन सुरेश पाटील यांची आज सोमवारी बिनविरोध निवड झाली.

बॅकेच्या व्हाईस चेअरमन पदासाठी तीन अर्ज आल्याने मतदान घेण्यात आले. यामध्ये अर्जुनराव गाडे 13 मते घेऊन विजयी झाले आहेत, त्यांनी कृष्णा पाटील डोणगावकर यांचा पराभव केला. त्यांना सात मतावर समाधान मानावे लागले. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची सोमवारी पहिली बैठक झाली.

या बैठकीत चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची निवड करण्यात आली. यावेळी दाबशेडे यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीराम सोनवणे, झुंजारे, सचिन जाधव, रामेश्वर रोडगे, अजय मोटे यांनी सहकार्य केले यावेळी कोविड नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

किरण पाटील डोणगावकर आणि देवयानी डोनगावकर हे दोन संचालक कोविड किट परिधान करून सभागृहात आले होते अन्य संचालकांचा कोविंड टेस्ट संबंधीचा निगेटिव्ह अहवाल पाहूनच त्यांना सभागृहात सोडण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या