विजेचा झटका लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

1555

खामगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा विद्युत तारेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवार सायंकाळी घडली आहे. शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील जाकिर भूरू पटेल (22), भुरू घासी पटेल (52), जावेद भूरू पटेल (25), साजेदा बी भूरू पटेल व (50) हे घरात असताना विद्युत तारेचा झटका लागून मृत्यू झाला.  या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. यातील जावेद याचे 7 जून तर जाकिर याचे 8 जूनला लग्न असून एकाची सासरवाडी वाशिम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगांव मधील असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या