संभाजीनगरात जनता कर्फ्युची कठोर अंमलबजावणी; दुचाकी बंद, बँकांनाही आवाहन

557

संभाजीनगर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 10 ते 18 जुलै दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दुचाकीवरून प्रवास करण्यास शहरात बंदी राहणार आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेत नागरिकांना दूध मिळेल. फक्त सरकारी पेट्रोल पंप सुरू राहतील. बँका व मेडिकल बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी सांगितले.

शहरात कोरोना पाँझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काल झालेल्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत पुन्हा एकदा नऊ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय पत्रकार परिषदेत म्हणाले, शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनता जनता कर्फ्यू यापूर्वीच्या लाँकडाऊन पेक्षा कडक असेल. पॉझिटिव्ह रुगांची सख्या कमी करणे आणि जास्तीत जास्त टेस्ट करण्याचा महापालिकेला प्रयत्न राहणार आहे. या काळात दुचाकीवरून प्रवास करण्यास शहरात बंदी राहणार आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेत नागरिकांना दूध मिळेल. फक्त सरकारी पेट्रोल पंप सुरू राहतील. या ठिकाणी सरकारी वाहने व अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वाहनांना पेट्रोल, डिझेल मिळेल.

पोलिसांना करणार सहकार्य
गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे यावेळी महापालिकेचे सुमारे 400 कर्मचारी काम करणार आहेत. शहरात सुमारे 200 पाँईट असतील, असे पांडेय यांनी सांगितले.

50 हजार टेस्टचे टार्गेट
जनता कर्फ्यूच्या काळात शहरात सुमारे 50 हजार टेस्ट करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. शहरात बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पाच प्रवेशाच्या ठिकाणी पथके तैनात असतील, असेही प्रशासकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या