शिवसेनेने जाणून घेतल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा

312

रतीच्या पावसाने संभाजीनगर जिल्हय़ातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी गंगापूर, रत्नपूर, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ओल्या दुष्काळामुळे उघडय़ावर पडलेल्या शेतकऱयांना सर्वतोपरी मदत केली जाईल आणि पीक विम्याचे पैसे मिळवून देणारच असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. देकयानी डोणगावकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या