संभाजीनगर – वडगाव कोल्हाटीत माजी उपसरपंचाच्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

10965

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील वडगाव कोल्हाटी येथे माजी उपसरपंच पुञाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी राञी साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा वडगावात दाखल झाला आहे.

वडगाव कोल्हाटी येथील दिवंगत माजी उपसरपंच हौसाबाई पाटोळे यांचा मोठा मुलगा बाळू वामन पाटोळे (वय – 35) याचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. या हत्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलील अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलिसांकडून पंचनामा सुरू असून हत्यामागचे कारण शोधले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या