हिंदुस्थान नंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाही टिकटॉक बॅन करण्याच्या तयारीत

tiktok-f

हिंदुस्थान चीन संघर्षाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली होती. आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाही टिकटॉक बॅन करण्याच्या विचारात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खासदार जिम मोलन म्हणाले की चायनीज सरकारकडून टिकटॉकचा गैरवापर केला जातो. तसेच टिकटॉकमधून माहिती चोरली जाते की नाही याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घालावी असे म्हटले जात आहे. टिकटॉकमुळे युजर्सची माहिती चोरली जाते असे अमेरिकेन म्हटले आहे.

टिकटॉकची मालकी असलेली कंपनी बाईट डान्सने हे सर्व आरोप फेटाळले आहे. टिकटॉकच्या कुठल्याही युजर्सच्या माहितीचा गैरवापर केला जात नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच टिकटॉकचे सर्वर  अमेरिकेत आहेत, त्यामुळे चायनीज सरकार त्या सर्व्हरमधून माहिती चोरण्याचा प्रश्नच उरत नाही.  कुठल्याही सर्वरमधून डेटा चोरीला जाणार नाही याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. तसेच जरी टिकटॉकने स्वतःहून काही डेटा डीलीट केला पण जर तो डेटा स्वतः युजर्सकडून किंवा इतर काही कारणांमुळे लीक झाला तर तो डीलीट करणे अशक्य आहे असेहे कंपनीने नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या