हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाला घाबरतो, स्टार्कची दर्पोक्ती

14
सामना ऑनलाईन । मेलबर्न
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचा मैदानाबाहेरील शाब्दिक सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं हिंदुस्थानी संघाला लक्ष्य करताना ‘त्यांना मालिका गमावण्याची भिती वाटते, त्यामुळे मैदानावर आणि मैदानाबाहेरही ते खेळाडू ऑस्ट्रलियाच्या खेळाडूंवर शाब्दिक वार करत आहेत’ असं स्टार्कनं म्हटलं आहे.
पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्टार्कला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. चार सामन्यांच्या मालिकेत याआधीही अनेक वाद झाले आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्टार्कनं सांगितलं की, ‘हिंदुस्थानी खेळाडू ऑस्ट्रेलियाविरोधात चर्चेत राहण्यासाठी मैदानात आक्रामक वर्तन करत आहे. मात्र आक्रामकता ही ऑस्ट्रेलियाची खासियत असून हे सामन्यामध्ये आवश्यक आहे आणि याचं आक्रामकतेसाठी ऑस्ट्रेलिया संघ ओळखला जातो असंही स्टार्क म्हणाला.
आपली प्रतिक्रिया द्या