क्रीडा : ऑस्ट्रेलियात चार महिन्यांनंतर फुटबॉलची रंगत

155

ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल चार महिन्यांनंतर फुटबॉल लीगला सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती फुटबॉल फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियाकडून यावेळी देण्यात आली. ऑस्ट्रेलियातील ‘ए लीग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा श्रीगणेशा 17 जुलैला होणार आहे. या स्पर्धेच्या 27 लढती चार आठवड्यांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना २३ ऑगस्टला पार पडेल. या स्पर्धेतील लढती पाहण्यासाठी फक्त 4500 फुटबॉलप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच कोरोनासंबंधित सर्व सुविधा स्टेडियममध्ये पुरवण्यात येणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या