सेक्स करतानाही सोशल डिस्टन्स पाळा, ऑस्ट्रेलिया सरकारची अजब नियमावली

कोरोना वरील लस आलेली आहे पण अजून कोरोना संपलेला नाही. हिंदुस्थानसह अनेक देशांत लसीकरणास सुरूवात केली आहे. असे असले तरी सरकारकडून काळी घेण्याचे आवाहन केले जात आहे. आता ऑस्ट्रेलियन सरकारने अजबच नियमावली जाहीर केली आहे. सेक्स करतानाही दाम्पत्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे ऑस्ट्रेलियन सरकारने नव्या नियमावलीत म्हटले आहे. तसेच जमल्यास लोकांनी फोनवरूनच लैंगिक सुखाचा आनंद घ्यावा असेही नियमावलीत म्हटले आहे.

आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने न्यु साऊथ वेल्स या वेबसाईटवर नागरिकांसाठी कोरोनासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार जर एखादे दाम्पत्य एकाच घरात राहत असतील तर त्यांनी निश्चिंतपणे सेक्स करावा. पण एखादा व्यक्ती बाहेरील व्यक्तीसोबत सेक्स करत असेल त्यांनी काही नियम पाळणे गरजेचे असल्याचे सरकराने म्हटले आहे.

बाहेरील आलेल्या व्यक्तीसोबत सेक्स करताना दोघांनी दीड मीटर अंतर राखावे असा विचित्र नियम नियमावली दिला आहे. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तेव्हा अशावेळी एकट्यानेच लैंगिक सुख मिळवावे असा सल्ला नियमावलीत देण्यात आला आहे, त्याआठी चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करावे असेही नियमावलीत म्हटले आहे.

सेक्स केल्याने कोरोना होतो असे कुठही आजवर सिद्ध झालेले नाही. पण मानवी लाळेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कपल्सनी किसही न करण्याचा सल्ला नियमावलीत दिला आहे. तसेच शक्य झाल्यास कपल्सनी तीन लेयरचा मास्क घालून आपले नाक आणि तोंड व्यवस्थित कवर करावे असेही नियमावलीत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या