ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, फिंचवर पराभवाचा डाग

90

सामना ऑनलाईन । बर्मिंघम

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल लढतीत यजमान इंग्लंडने पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 224 धावांचे माफक आव्हान इंग्लंडने 33 व्या षटकात गाठले. या पराभवासह ऑस्ट्रेलियाच्या सहावे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच त्यांचा संघ सेमी फायनलमध्ये पराभूत झाला आहे.

ऑस्ट्रेलियाने याआधी 7 वेळा वर्ल्डकप सेमी फायनल गाठली आहे. या प्रत्येक लढतीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. अपवाद फक्त 1999 चा आहे. 1999 ला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील सामना बरोबरीत सुटला होता, परंतु रनरेटच्या आधारे ऑस्ट्रेलियाने फायनल गाठली होती. यंदा मात्र ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला. या पराभवामुळे कर्णधार अॅरॉन फिंच निराश झाला.

वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन –
1975 – इंग्लंडवर चार विकेटने विजय
1987 – पाकिस्तानवर 18 धावांनी विजय
1996 – वेस्ट इंडीजवर पाच धावांनी विजय
1999 – आफ्रिकेसोबत सामना बरोबरीत
2003 – श्रीलंकेवर 48 धावांनी विजय
2007 -आफ्रिकेवर सात विकेट्सने विजय
2015 – हिंदुस्थानवर 95 धावांनी विजय
2009 – इंग्लंडकडून 8 विकेट्सने पराभव

आपली प्रतिक्रिया द्या