ऑस्ट्रेलियात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत क्वारंटाईन नागरिकांशी सेक्स, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

ऑस्ट्रेलियामध्ये एका हॉटेलमध्ये ज्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते, त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत सुरक्षा रक्षकांसोबत सेक्स केला आहे.  त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सरकाराने आता 6 आठवड्यांसाठी लॉकडाऊन जारी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमली आहे.

फोर्ब्स या मासिकाने याबाबत वृत्त दिले आहे. कोरोना साथरोग जाहीर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी विमानांवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून प्रत्येक पर्यटकाला हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन राहण्याची सक्ती करण्यात आली. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात स्टॅम्फर्ड प्लाझा हे पंचतारांकित हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काही नागरिक क्वारंटाईन करण्यात आले. तिथे सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन होण्यासाठी तीन खासगी सुरक्षा रक्षकांच्या संस्थेला कंत्राट देण्यात आले होते. पण या हॉटेलमध्ये सर्व नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. अनेक सुरक्षा रक्षक आणि क्वारंटाईन नागरिकांनी सुरक्षा रक्षकांसोबत सेक्स केला. तसेच अनेक रूममधील लोक आपल्या रूममध्ये थांबण्यापेक्षा दुसर्‍यांच्या रूममध्ये जाऊन पत्ते आणि इतर खेळ खेळत होते. सुरक्षा रक्षकांनी 8-8 तास एकच पीपीई किट वापरले होते. तसेच या सुरक्षा रक्षकांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क आला. त्यामुळे या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या पंचतारांकित हॉटेलमध्ये आतापर्यंत 31 कोरोनाचे रुग्ण आढळले. या सुरक्षा रक्षकांनी कामादरम्यान अक्षम्य अशा चुका केल्या. त्यात अनेकवेळी आपली ड्युटी करण्या ऐवजी हे सुरक्षा रक्षक झोपा काढत होते. हात मिळवायचा नाही अशी कडक सूचना असून त्यांनी अनेकांशी हात मिळवले. हे सुरक्षा रक्षक 42 बाहेर जणांच्या संपर्कात आले त्यामुळे 53 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर 6 आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन जारी केल्यानंतर शहरात 200 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. व्हिक्टोरिया राज्यात दिवसाला 22 कोरोनाचे रुग्ण आढळले असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या 772 वर पोहोचली आहे. या प्रकरणी सरकारने एक समिती नेमली असून याची चौकशी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या