ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा घोषणा, IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना मिळाले स्थान

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. तिन्ही संघाची धुरा विराट कोहली याच्या खांद्यावर असून आयपीएल 2020 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे नाव या खेळाडूंमध्ये नाही. आयपीएल 2020 मध्ये देखील गेल्या 2 लढतीत तो मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

कसोटी संघ –

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य (उप कर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धिमन साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

एक दिवसीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उप-कर्णधार, विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

save_20201026_211214

टी-20 संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उप कर्णधार, विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती.

आपली प्रतिक्रिया द्या