ऑस्ट्रेलियन ओपन; वर्ल्ड नंबर वन नाडाल सहज चौथ्या फेरीत

353
राफेल नदाल (देश : स्पेन) - १५ ग्रॅन्ड स्लॅम

मेलबर्न – आपल्या आणखी एक मानाच्या ग्रँड स्लॅम टेनिस जेतेपदाकडे कूच करणाऱ्या स्पेनच्या जागतिक अग्रमानांकित राफेल नाडालने आपल्याच देशाच्या 30 व्या मानांकित पाब्लो करेनो बुस्ता या 6-1 ,6-2 ,6-4 असे सहज पराभूत करीत ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीची चौथी फेरी गाठली. शुक्रवारी सुपरस्टार रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनचे कडवे आव्हान 4 तासांच्या झुंजीत 4-6, 7-6, 6-4, 4-6, 7-6 असे संपुष्ठात आणून औट्रेलिअन ओपनमध्येही आपला 100 वा विजय साकारला होता. याआधी त्याने अमेरिकन ओपनमध्ये 100 विजय मिळवण्याचा पराक्रम केला होता.असा पराक्रम करणारा फेडरर जगातील पहिला टेनिसपटू ठरला आहे.

महिला एकेरीत उलटफेर सुरूच

यंदा या स्पर्धेतील महिला गटातील निकालातील उलटफेराची मालिका आजही सुरु राहिली. झेक प्रजासत्ताकाची जागतिक दुसरी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा रशियाच्या अनास्तासियाची शिकार बनली.अनास्तासिया पावल्यूचेंकोवाने बलाढ्य कॅरोलिनाला 2 तास 25 मिनिटांच्या झुंजीत 7-6, 7-6 असे सरळ सेट्समध्ये पराभूत करीत सनसनाटी निकालाची नोंद केली. प्लिस्कोवा जागतिक 30वी मानांकित खेळाडू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या