गळ्यात पट्टा आणि पिंजऱ्याचा कैदखाना! महिलांना Sex Slave बनविणाऱ्या माजी सैनिकाला अटक

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी महिलांना डांबून ठेवल्याप्रकरणी एका माजी सैनिकाला अटक केली आहे. जेम्स डेव्हीस (40 वर्ष) असं त्याचं नाव असून त्याने अनेक महिलांना Sex Slave म्हणजेच स्वत:ची वासना भागवण्यासाठी गुलाम बनवून ठेवलं होतं. जेम्स या महिला पळून जाऊ नयेत यासाठी त्यांच्या गळ्यात स्टीलचा पट्टा घालून ठेवायचा. या महिलांना पिंजऱ्यात कोंडून ठेवलं जात होतं आणि त्यांच्याकडून देहविक्रीचा धंदाही करवला जात होता.

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ग्रामीण भागात असलेल्या जेम्सच्या घरी छापा मारला तेव्हा तेही हादरले होते. त्यांनी जे काही पाहिलं त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांना जेम्सच्या घरात काही पिंजरे सापडले होते, ज्यात महिलांना जनावराप्रमाणे कोंडून ठेवलं जात होतं. जेम्स महिलांना भुलवून त्याच्या घरी आणायचा आणि तिथे आल्यानंतर त्यांचे मानसिक आणि लैंगिक शोषण करायचा. जेम्सची मालमत्ता अफाट असून त्याच्या घराची आणि आसपासच्या परिसराची झाडाझडती घेण्यासाठी पोलिसांना 15 तासांची मेहनत करावी लागली.

पोलिसांच्या छापेमारीमध्ये त्यांना 4 पिंजरे असे सापडले आहेत ज्यावर त्यात कैद केलेल्या महिलांची नावे कोरण्यात आली होती. जेम्सच्या घरातून सेक्स टॉयदेखील सापडली आहेत. जेम्सने जवळपास 17 वर्ष सैन्यात घालवली होती. तिथून बाहेर पडल्यानंतर तो या गोष्टीकडे कसा वळाला हे अजून कळू शकलेलं नाहीये. जेम्सने 3 वर्ष विविध महिलांना सेक्स गुलाम करून ठेवलं होतं. जेम्स या महिलांकडून देहविक्रयाचेही काम करवून घेत होता आणि यातून मिळालेला एकही पैसा तो महिलांना देत नव्हता असं पोलिसांनी सांगितलं आहे. पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ठार मारून टाकेन अशी धमकी जेम्स या महिलांना देत होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या