चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा

17

सामना ऑनलाईन । मेलबर्न

जून महिन्यात होणाऱ्या आसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी मिशेल स्टार्क, जेम्स पेटिंसन, जोश हेजलवुड आणि पैट कमिंस या चार गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस लीनलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स फॉकनर याला मात्र संघात स्थान मिळवता आलेलं नाहीये.

हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असताना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क जायबंदी झाला होता. त्याचा पाय दुखावल्याने हिंदुस्थान दौरा अर्धवट सोडून तो मायदेशी परतला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो फिट होईल अशी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला आशा वाटत आहे. त्यामुळे त्याचं नाव या संघातमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे.

१८ जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठीच्या अ गटात इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे, तर ब गटात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, भारत यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया संघ
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेविड वार्नर, पॅट कमिंस, अॅरोन फिंच, जान हेस्टिंग्स, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोइजेस हेनरिक्स, क्रिस लिन, ग्लेन मैक्सवेल, जेम्स पेटिंसन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मैथ्यू वेड, एडम जंपा.

आपली प्रतिक्रिया द्या