मुलीने केली आईची हत्या, मुंडके रस्त्यावर फेकले

119

सामना ऑनलाईन । सिडनी

एका माथेफिरू तरुणीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या करून तिचे मुंडके छाटल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. ती तरुणी इतक्यावरच नाही थांबली तर रक्ताने माखलेले आईचे मुंडके घेऊन ती घराबाहेर गेली व तिने ते शेजारच्यांच्या घराबाहेरील रस्त्यावर फेकले. याप्रकरणी पोलिसांनी त्या तरुणीला अटक केली असून तिच्या मनोरुग्ण विभागात चाचण्या सुरू आहेत.

25 वर्षीय सदर तरुणी तिच्या 57 वर्षीय आईसोबत सिडनी शहरात राहायची. शनिवारी रात्री त्या दोघींमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्या तरुणीने तिच्या आईवर धारदार सुऱ्याने वार केले व तिचे मुंडके छाटले. त्यानंतर ती आईचे मुंडके घेऊन घराबाहेर आली व शेजाऱ्यांच्या घराबाहेर असलेल्या रस्त्यावर तिने ते मुंडके फेकले. हा प्रकार पाहून हादरलेल्या शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या मृत धडाशेजारी बसलेल्या त्या विकृत तरुणीला अटक केली आहे.