ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू होणार ‘मालामाल’

15

सामना ऑनलाईन । मेलबर्न

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) देशाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सच्या मानधनात भरघोस वाढ केल्याने आता ‘कांगारूं’चे पुरुष व महिला क्रिकेटपटू चांगलेच मालामाल होणार आहेत. नव्या वाढीनुसार ऑस्ट्रेलियाच्या एका आंतरराष्ट्रीय खेळाडूचे वार्षिक १४ लाख ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतके होणार आहे. क्रिकेट बोर्डाच्या या समझोत्याला अद्यापि ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटूंनी सहमती दाखवलेली नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नव्या अहवालानुसार ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वार्षिक मानधनात २०२१ पर्यंत ८,१६,०० ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी वाढ होणार आहे. या वाढीसोबतच बिग वॅश लीग, मॅच फी आणि कामगिरीचा बोनस असा मिळून एक आंतरराष्ट्रीय ‘कांगारूं’च्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात १२५ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटरचे मानधन ७९,००० डॉलरवरून १,७९,००० ऑस्ट्रेलियन डॉलर इतके होणार आहे. २०२१ पर्यंत हा मानधनाचा आकडा २ लाख १० हजार डॉलर इतका वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या