आर.अश्विन, रोहीत शर्मा जायबंदी; जाडेजाची संघात वर्णी

34

सामना ऑनलाईन, पर्थ

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघाला जबरदस्त हादरा बसला आहे. फिरकीपटू आर.अश्विन आणि रोहित शर्मा हे दोघेही जण दुखापतीमुळे दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाहीयेत. युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा यापूर्वीच पाय मुरगळल्याने जायबंदी झाला आहे. पृथ्वी शॉ दुखापतीमुळे पहिली कसोटी खेळू शकला नव्हता आणि दुसऱ्या कसोटी सामन्यालाही त्याला मुकावे लागणार आहे.

पहिल्या कसोटीमध्ये प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या अश्विनच्या पोटाचा स्नायू खेचला गेल्याने जायबंदी झाला आहे तर रोहित शर्मा पाठीच्या दुखण्यामुळे पर्थ कसोटी खेळू शकणार नाहीये. अश्विनच्या जागी रवींद्र जाडेजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या