ब्रिटनच्या निवडणुकीचा अंदाज चुकला म्हणून विश्लेषकाने पुस्तकच गिळले

14

सामना ऑनलाईन, लंडन

दोन टक्के म्हणजे थोडाथोडका नव्हे तर खूप मोठा फरक आहे. मी शब्दाला पक्का आहे. त्यामुळे हे पुस्तक मी खाऊन टाकत आहे… असे म्हणत राजकीय विश्लेषक आणि ‘ब्रेक्झिट- वाय ब्रिटन वोटेड टू लिव्ह द युरोपियन युनियन’ या पुस्तकाचे सहलेखक मॅथ्यू गुडविन यांनी स्वत:च्या पुस्तकाची पाने फाडली आणि तोंडात टाकली. ‘स्काय न्यूज’ चॅनेलच्या लाइव्ह शोमध्ये हा प्रकार घडला आणि सारेच थक्क झाले. नुकत्याच पार पडलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीत जेरेमी कोर्बीन यांच्या लेबर पार्टीला ३८ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळणार नाहीत, असे भाकीत  मॅथ्यू गुडवीनने ट्विटवर केले होते. एवढेच नव्हे तर तसे झाल्यास नवे पुस्तक आनंदाने खाईन असेही म्हटले होते. प्रत्यक्षात लेबर पार्टीला ४०.३ टक्के मते पडल्यानंतर गुडवीनच्या प्रतिक्रियेकडे साऱयांचे लक्ष लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या