महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृत रिक्षावाल्याला अटक

50

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृत रिक्षावाल्याला अटक करण्यात आली आहे. राजबहादूर पाल असं या रिक्षावाल्याचं नाव आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता.

ही महिला बुधवारी रात्री मालाडहून बोरीवलीच्या दिशेने जात होती. मालाडच्या इन्फिनिटी मॉल परिसरातून तिने रिक्षा पकडली होती. जेव्हा तिची रिक्षा कांदिवली भागात आली तेव्हा तिला एक फोन आला. जेव्हा ती फोनवर बोलत होती तेव्हा रिक्षा चालकाच्या हालचाली तिला खटकल्या. सुरुवातीला तिला तो नीट बसण्याचा प्रयत्न करत असावा, असं वाटलं. मात्र नंतर त्याच्या या हालचाली वाढल्या आणि तो हस्तमैथुन करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. हा प्रकार तिने आपल्या मित्राला फोनवर सांगितला. त्याने बोरीवलीला रिक्षा थांबवता क्षणीच महिलेने रिक्षातून उतरून पळ काढला आणि या घटनेसंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली.

”बोरीवली पर्यंत जात असताना ज्या ठिकाणी रस्त्यावर कोणी नसेल अशा ठिकाणी रिक्षा चालकाच्या हालचाली वेगाने होत होत्या. जेव्हा तो हस्तमैथुन करतो आहे हे माझ्या लक्षात आले तेव्हा मी रिक्षा सोडून तिथून पळ काढला. त्यावेळी काही लोक तिथे उभे होते मात्र कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही. जेव्हा ही घटना लक्षात आली तेव्हा माझे घर काही अंतरावरच होते, मी पोलिसात तक्रार नोंदवली,” असं या महिलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

summary- auto rickshaw driver masturbated in front of woman got arrested

आपली प्रतिक्रिया द्या