पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा, आता फक्त 7 रुपयात करा 100 किमी प्रवास…

इंधन दरवाढीने सामान्यांची चिंता वाढली आहे. पेट्रोलसह डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला एका अशा दुचाकी बद्दल माहिती सांगत आहोत, जी फक्त 7 रुपयात 100 किमी धावते. ही एक इलेक्ट्रिक बाईक असून Atumobile कंपनीने ही दुचाकी लॉन्च केली आहे. वाढत्या पेट्रोलच्या किंमतीत ही बाईक सर्वसामान्यांसाठी परवडणारी राईड ठरू शकते, असा कंपनीचा दावा आहे. आज आपण याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Atumobile ही हैदराबादमधील स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक बाईकचे नाव Atum 1.0 असे ठेवले आहे. या इलेक्ट्रिक बाईकला चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात आणि एकदा चार्ज झाल्यावर ही बाईक 100 किमीपर्यंत धावू शकते. ही बाईक 100 किमी चालवण्यासाठी केवळ 7 ते 8 रुपये इतका खर्च येतो, असा कंपनीचा दावा आहे. यात एक विशेष बॅटरी लावण्यात आली, ज्यावर कंपनी 2 वर्षांची वॉरंटी देखील देते.

कंपनीने ही बाईक आपल्या अधिकृत संकेतस्थळ atumobile.com वर लाँच केली आहे. सध्या ही बाईक फक्त याच संकेतस्थळावरून बुक केली जाऊ शकते. आता पर्यंत 400 हुन अधिक बाईक बुक झाल्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. कंपनीने या बाईकची किंमत 50 हजार रुपये इतकी ठेवली आहे. यात आरामदायक सीट तसेच डिजिटल डिस्प्ले, एलईडी हेडलाइट, इंडिकेटर आणि टेल लाईट्स आहेत. याचा जास्तीत जास्त वेग ताशी 25 किमी प्रतितास इतका आहे.

आपली प्रतिक्रिया द्या