2020 Datsun Redi GO Facelift हिंदुस्थानात लॉन्च; 2.83 लाखापासून किंमत सुरु…

कार निर्माता कंपनी Datsun ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन 2020 Redi-GO Facelift लॉन्च केली आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

इंजिन आणि पॉवर

Datsun Redi-GO facelift 800 सीसीचे 3 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. तसेच दुसरे 999 सीसी 3-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. याच्या एएमटी पर्याय टॉप आणि टी (ओ) व्हेरियंट मध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. नवीन Datsun Redi-GO facelift 800 कार D, A, T, T(O) 800cc, T(O) 1.0 आणि T(O) 1.0 AMT व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. 800 सीसीचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन 54 बीएचपी पॉवर आणि 73 एनएम टॉर्क जनरेट करते. 1.0 लीटर इंजिन 67 बीएचपीची पॉवर आणि 91 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5 स्पीड एएमटीच्या पर्यायासह उपलब्ध आहे. ही कार 20.71 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. तसेच  1.0 लीटर व्हेरियंट 21.70 kmpl आणि 1.0 लीटर एएमटी 22 kmpl मायलेज देऊ शकते.

फीचर्स

2020 Redi-GO 2020 मध्ये नवीन इंटीरियरसह एक नवीन केबिन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. सोबतच ब्लॅक अँड गनमेटल ग्रे ड्युअल टोन ट्रीटमेंट, फॅब्रिक फ्रंट डोअर ट्रिम आणि नवीन 8 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले अॅपल  कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोने सुसज्ज आहे.

किंमत

 2020 Datsun Redi-GO Facelift प्रारंभिक किंमत 2.83 लाखापासून सुरु होते. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधीकृत संकेतस्थळाला भेट द्या.

आपली प्रतिक्रिया द्या