2020 Kia Seltos 10 हिंदुस्थानात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत..

2948

Kia Motors India ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन 2020 Seltos लॉन्च केली आहे. कंपनीने जुन्या व्हेरियंटच्या तुलनेत या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन मॉडेलमध्ये आता 10 नवीन फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये कंपनीने सुरक्षा, सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि डिझाइनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे.

नवीन 10 अपडेटसह 2020 Kia Seltos मध्ये आपत्कालीन स्टॉप सिग्नल देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एचटीएक्स, एचटीएक्स + आणि जीटीएक्स, जीटीएक्स + व्हेरिएंटमध्ये 8 अतिरिक्त फीचर्स देखील दिले आहेत. तसेच यात व्हॉईस असिस्ट वेक अप कमांड – Hello Kia, स्मार्टवॉच अ‍ॅप कनेक्टिव्हिटी, यूव्हीओ लाइट – कंट्रोल एअर प्युरिफायर दिले आहे.

किंमत

2020 Kia Seltos ची किंमत प्रारंभिक किंमत 9.89 लाखांपासून सुरु होते. जी 17.34 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.

आपली प्रतिक्रिया द्या