Skoda Karoq हिंदुस्थानात लॉन्च; किंमत किती?

2857

देशात लॉकडाऊन सुरु असतानाच हिंदुस्थानी बाजारात 2020 Skoda Karoq ही एसयूव्ही लॉन्च झाली आहे. Karoq हिंदुस्थानात सीबीयू (कॉंप्लिली बिल्ट युनिट) मॉडेल म्हणून आणले जाणार आहे. हे मॉडेल फक्त टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.

Skoda Karoq मध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड टीएसआय पेट्रोलसह येत. जे 148 bhp पॉवर वर 250 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड डीएसजी स्वयंचलित गिअरबॉक्सच्या स्टॅंडर्डसह दिल गेलं आहे. ही एसयूव्ही 0-100 किमी प्रति गती प्राप्त करण्यासाठी 9 सेकंद इतका वेळ घेते. याची टॉप स्पीड 202 kmph आहे.

किंमत

कंपनीने Skoda Karoq ची किंमत 24.99 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या