2021 मध्ये लॉन्च होणार ‘या’ दमदार बाईक; कमी किंमत, पॉवरफुल्ल फीचर्स

कोरोना संकटाच्या दडपणात 2020 हे वर्ष सरल असून 2021 चे पदार्पण झाले आहे. अनेकांना या वर्षाकडून खूप अपेक्षा आहेत. कोरोना आजार आणि लॉकडाऊनचा तडाखा सर्वच क्षेत्रांना बसला आहे. यादरम्यान, अनेक कंपन्या बंद पडल्या तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याचाच फटका वाहन उत्पादक क्षेत्रालाही बसला आहे. अनलॉक झाल्यानंतर काही दमदार बाईक लॉन्च झाल्या आहेत. मात्र 2021 हे वर्ष वाहन क्षेत्रासाठी नवीन भरारी घेणारं ठरणार आहे. यावर्षात अनेक पॉवरफुल्ल, अत्याधूनिक फीचर्स असलेले आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या खिशाला परडवणाऱ्या बाईक लॉन्च होणार आहेत.

बर्‍याच बाईक कंपन्या या वर्षी आपल्या टॉप क्लास बाईक्स बाजारात आणणार आहेत. या यादीमध्ये तुम्हाला रॉयल एनफील्ड, केटीएम, होंडा आणि ट्रीयम्फ सारख्या बाईकचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला यातीलच काही बाईक बद्दल माहिती सांगणार आहोत.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 न्यू जनरेशन

चेन्नईस्थित दुचाकी बनवणार्‍या कंपनीची ही पहिली बाईक असेल. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 न्यू जनरेशन बऱ्याच वेळी सार्वजनिक रस्त्यावर चाचणी दरम्यान पाहण्यात आली आहे. अशाच ही बाईक 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केली जाऊ शकते.

केटीएम आरसी 200

नवीन जनरेशन केटीएम आरसी 200 नुकतीच त्याच्या प्रोडक्शन लाईनमध्ये पाहण्यात आलं आहे. अशातच ही बाईक लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. याची स्टाईलिंग आणि डिझाइन अद्ययावत करण्यात आले आहेत. ही बाईक अनेक नवीन फीचर्ससह लॉन्च करण्यात येणार आहे.

होंडा सीबीआर 650 आर

होंडा सीबीआर 650 आर बाईकला भारतीय बाजारात अद्ययावत करण्यात येत आहे. नवीन मॉडेल 2021 वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च करण्यात येऊ शकते. ही बाईक बीएस 6 अनुरुप पॉवरट्रेन आणि बर्‍याच नवीन फीचर्ससह सुसज्ज असले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ही बाईक वर्ष 2020 मध्येच लाँच करण्यात आली आहे.

ट्रीयम्फ टायगर 850 स्पोर्ट (Triumph Tiger 850 Sport )

कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर ही बाईक आधीच प्रदर्शित करण्यात आली आहे. अशातच ही बाईक लॉन्च झाल्यानंतर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एंट्री-लेव्हल मोटरसायकल टायगर 900 ची जागा घेईल.

आपली प्रतिक्रिया द्या