Aprilia SXR 125 मॅक्सी-स्कूटर हिंदुस्थानात लाँच, अवघ्या 5 हजारात करा बुकिंग…

इटालियन दुचाकी निर्माता Aprilia ने आपल्या नवीन स्कूटर SXR 125 ची किंमत जाहीर केली आहे. कंपनीने या दमदार स्कूटरची प्रारंभिक किंमत 1.15 लाख रुपये इतकी ठेवली आहे. नवीन Aprilia SXR 125 स्कूटर Aprilia SXR 160 स्कूटरवर आधारित आहे. जी कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये लाँच केली होत. यात Aprilia SR 125 मध्ये असलेलेच इंजिन देण्यात आले आहे.

Aprilia SXR 125 मध्ये 125cc चे सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड थ्री-व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,600rpm वर 9.4bhp ची पॉवर आणि 6,250rpm वर 9.2nm ची पीक टॉर्क जनरेट करते. हिंदुस्थानी बाजारामध्ये या स्कूटरची स्पर्धा सुझुकी बर्गमन स्ट्रीट सोबत होणार आहे. ज्याची किंमत 84,371 रुपये इतकी आहे.

फीचर्स

Aprilia SXR 125 मध्ये फुल एलईडी लाइटिंग सेटअप, यूएसबी चार्जिंग पोर्ट, स्टोरेज स्पेस, उंच विंडस्क्रीन, लॉक फ्रंट स्टोरेज आणि 7-लिटर इंधन टाकी देण्यात आली आहे. तसेच यात कॉम्बी ब्रेक सिस्टम (सीबीएस) देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या