‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त बाईक; देते 90 किमीचा मायलेज 

2544

तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत आहात? तुमचा बजेट 50 हजार इतका आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Bajaj Auto च्या एका अशा बाईक बद्दल सांगणार आहोत जी हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त बाईक पैकी एक आहे. ही बाईक आहे ‘Bajaj CT 100’. या बाईकची प्रारंभिक (एक्स-शोरुम) किंमत 32,000 रुपये इतकी आहे. म्हणजेच ही बाईक प्रीमियम स्मार्टफोन पेक्षाही स्वस्त आहे. आज आम्ही तुम्हला या बाईकच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतबद्दल सांगणार आहोत.

परफॉर्मन्स

  • Bajaj CT 100 ES मध्ये 102 सीसीचे इंजिन देण्यात आले. जे  7.7 PS पॉवर आणि 5500 आरपीएमवर  8.24 Nm टॉर्क जनरेट करते.
  • Bajaj CT 100 KS Alloy मध्ये 102 सीसीचे इंजिन देण्यात आले जे  7500 आरपीएमवर 8.2 PS पॉवर आणि  4500 आरपीएमवर 8.05 Nm टॉर्क जनरेट करते.
  • Bajaj CT 100B मध्ये 102 सीसी इंजिन 785 7500 आरपीएमवर 8.2 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते.
  • ट्रान्समिशन – Bajaj CT 100 बाईकचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

bajaj-ct-100-ebony-black-red-decals

टॉप स्पीड

Bajaj CT 100 बाईक हिंदुस्थानी रस्त्यावर ताशी 90 किलोमीटर वेगाने धावू शकते.

मायलेज

या बाइकमध्ये 10.5 ची इंधन टाकी देण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, ही बाईक प्रति लिटर 90 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते.

bajaj-ct-100-price-drop

किंमत

Bajaj CT 100 B ची प्रारंभिक किंमत 32,000 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. तर याच्या  CT 100 KS Alloy व्हेरियंटची सुरुवाती किंमत 33,293 रुपये आणि CT 100 KS Spoke ची किंमत 32,000 रुपये इतकी आहे. तसेच याच्या CT 100 ES Alloy व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ही 41,133 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या