बजाजची ‘फायदा ही फायदा’ ऑफर; या दोन बाईकवर मिळतेय मोठी सवलत

2018

वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला आहे. अशातच अनेक वाहन निर्माता कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या गाडीवर अनेक मोठ्या सवलती देतात. दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोनेही आपल्या बाईकवर मोठी सवलत जाहीर केली आहे. चला तर जाणून घेऊ बजाजने आपल्या कोणत्या बाईकवर किती सवलत जाहीर केली आहे.

बजाजने डिसेंबरमध्ये आपली ‘फायदा ही फायदा’ ही ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनीच्या वतीने Bajaj Platina H Gear 110 आणि Bajaj CT 110 च्या खरेदीवर 3200 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. तसेच या बाईकवर 2000 रुपयांपर्यंत बचत देखील आपल्याला करता येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या बाईकवर 5 वर्षांची मोफत सर्व्हिस आणि 5 वर्षाची warranty देखील मिळणार आहे.

परफॉर्मन्स

  • Bajaj Platina 110 H-Gear मध्ये 115 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे 7000 आरपीएम वर 8.6 PS पॉवर आणि 5000 आरपीएम वर 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे.
  • Bajaj CT 110 मध्ये Platina 110 चे 115 सीसी DTS-i इंजिन देण्यात आले आहे. जे 8.6 bhp पॉवर आणि 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे.

मायलेज

Bajaj Platina 110 H-Gear 84 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते. तर  Bajaj CT 110 ही बाईक 104 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते

किंमत

Bajaj Platina 110 H-Gear ची एक्स-शोरूम किंमत 53, 875 रुपये आहे. तर Bajaj CT 110 ची एक्स-शोरूम किंमत 39 994 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या