Bajaj ‘चेतक’ पुन्हा बाजारात, नव्या रुपात दमदार एंट्री

3323
देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाजने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर Bajaj Chetak हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केली आहे. सर्व दुचाकी आणि चारचाकी निर्माता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात आणण्यावर भर देत आहे. अशातच बजाज आपली इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात उतरवली आहे.
chetak_1571213609687
अर्थ मंत्रालयाने दिलेला टॅक्स ब्रेक आमच्यासाठी मोठा उत्तेजन देणारा आहे. याचा मोबदला आम्ही ग्राहकांना कुठल्या तरी मार्गाने देऊ. जानेवारीपासून स्कूटरची विक्री सुरू होईल, असे बजाजचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी सांगितले आहे. सुरुवातीला ही स्कूटर पुणे आणि बेंगळुरू येथे लॉन्च करण्यात येणार आहे, अशी माहितीही राकेश शर्मा यांनी दिली आहे.
eg_cirxuuaabydf
बजाजच्या या नवीन स्कुटरमध्ये ट्यूबलेट टायर्स, कर्व्ह्ड बॉडी पॅनेल्स, 12 इंचाच्या अ‍ॅलॉय व्हील्ससह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ओव्हर-द-एअर अपडेट्स, लोकेशन ट्रॅकिंग, फाईंड माय व्हीनकल व रिमोट स्टार्ट सारख्या फीचर्स देण्यात आले आहे. ही स्कूटर स्पोर्ट मोडमध्ये 85 किमी चालू शकते, तर इको मोडमध्ये 95 किमी पर्यंत चालू शकते. Bajaj Chetak Electric Scooter ची किंमत अद्याप कळू शकलेली नाही.
आपली प्रतिक्रिया द्या