Benelli Imperiale 400 BS6 हिंदुस्थानात लॉन्च; किंमत किती?

3014

Benelli India ने आपली क्लासिक Benelli Imperiale 400 बाईक BS6 मानकांसह हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहक 6 हजार रुपये टोकन रक्कम देऊन ही बाईक बुक करू शकतात. यासह कंपनी आपल्या या बाईकवर 3 वर्ष अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी देत आहे. Benelli Imperiale 400 ची पहिली BS6 बाईक आहे.

Benelli Imperiale 400 BS6 मध्ये 374 cc चे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे इंधन इंजेक्शनसह येते. 6,000 rpm हे इंजिन 20.7 bhp पॉवर आणि 3,500 rpm वर 29 km टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

किंमत

Benelli Imperiale 400 BS6 या बाईकची किंमत कंपनीने 1.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. Benelli Imperiale 400 BS6 या बाईकची हिंदुस्थानी बाजारात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 शी स्पर्धा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या